केजरीवालांच्या आज-उद्या गोव्यात ४ सभा होणार

0
111

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या आज ७ व उद्या ८ या दोन दिवस गोव्यात ४ जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा आज संध्याकाळी ५ वा. बाणावली मतदारसंघात होणार आहे. तद्नंतर त्यांची दुसरी सभा वास्को मतदारसंघात होणार असून मुरगाव नगरपालिकेजवळ शहराच्या चौकात ती होईल, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष व पणजीचे आमदार वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी ८ रोजी केजरीवाल यांची म्हापसा येथे सभा होईल. ही सभा संध्याकाळी ५ वाजता टॅक्सी स्टॅण्ड येथे होईल. ही सभा संपल्यानंतर साखळीत साखळी येथील देसाईनगर येथे त्यांची सभा होणार आहे. केजरीवाल हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटून या दोन दिवसांच्या दौर्‍यात त्यांच्याशीही संवाद साधणार आहेत. यावेळी ते पक्ष कार्यकर्त्यांशी निवडणूक डावपेच, प्रचाराचे तंत्र आदीसंबंधी बोलणी करणार असल्याचे आशुतोष यांनी सांगितले.
एल्विस गोम्सना बदनाम करण्याचे प्रयत्न
दरम्यान, आम आदमी पार्टीचे गोव्यातील
मुख्यमंत्रीपदासाठीचे उमेदवार एल्विस गोम्स यांना बदनाम करण्यासाठी भाजप सरकार त्यांना अटक करून त्यांच्यावर खटले घालण्याची तयारी करीत असल्याचा आरोपही यावेळी आशुतोष यांनी केला. त्यासाठी खात्यातील ङ्गाईल्स गोळा करण्याचे काम चालू असल्याची माहिती मिळाली असल्याचे ते म्हणाले. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाच प्रकारे सीबीआयचा वापर करून आम आदमी पार्टीचे मंत्री व आमदार यांचा छळ चालवला असल्याचे ते म्हणाले. एल्विस गोम्स निष्कलंक असल्याचा दावा त्यांनी
केला.