केजरीवालांकडून काळ्या पैशांचा वापर

0
77

भाजपचा सनसनाटी आरोप
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून काल भाजपने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करताना ते बोगस कंपन्यांच्या नावे पक्षासाठी काळ्या पैशांचा वापर करीत असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. या प्रकाराची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी अशी मागणी पक्षाने केली आहे.पत्रकारांशी बोलताना वीजमंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आपला देणग्या देणार्‍या कंपन्यांच्या व्यवहार संशयास्पद आहे. सदर कंपन्या तोट्यात असताना एवढ्या प्रमाणात निधी कसा देऊ शकतात असा सवाल उपस्थित करून त्यांनी निवडणूक आयोगाने या प्रकाराची त्वरित दखल घेण्याची मागणी केली आहे.
आपला देणग्या दिलेल्या कंपन्या बोगस आहेत. या कंपन्यांची कार्यालयेही छोट्या छोट्या घरांत आहेत. त्यांचे स्वत:चे व्यवस्थापनही नाही. त्यांच्या वेबसाइटवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्या नुकसानीत चालत असल्याची माहिती मिळाली. सदर कंपन्या कंपनी कायद्याचे पालन करीत नसल्याचा आरोप भाजपचे गोयल यांनी केला आहे.
सीतारामन यांनी या कंपन्यांची निर्मिती खास आपला पैसा पुरवण्यासाठी केली असल्याचा आरोप केला. या कंपन्या ङ्गायद्या नसल्याने त्या देणग्या देऊ शकत नाहीत. आश्‍चर्याची बाब म्हणजे या कंपन्यांचे ३१ संचालकही तेच असल्याचा गौप्यस्ङ्गोट त्यांनी केला. चार कंपन्यांकडून आपला २ कोटींच्या देणग्या मिळाल्या असताना वेबसाइटवर ङ्गक्त ५५ लाख रुपयेच दाखविण्यात आले असल्याने आप पक्षाचे पदाधिकारी मतदारांची ङ्गसवणूक करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
कॉंग्रेस पक्षानेही केजरीवाल घेत असलेल्या देणग्यांविषयी चौकशीची मागणी केली आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, स्वत:ला स्वच्छ संबोधणारे आता गैरमार्गाने पैसे उकळीत आहेत.
दरम्यान, ‘आप’चे नेते पंकज म्हणाले की, पक्षाला मिळालेल्या निधीची माहिती पूर्णपणे संकेतस्थळावर देण्यात आली आहे. प्रत्येक रुपयाचा हिशेब आमच्याकडे आहे. सर्व निधी चेकद्वारेच देण्यात आल्याचे ते म्हणाले. आपचे नेते मयंक गांधी यांनीही पक्ष बोगस कंपन्यांकडून निधी घेत असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला.
दरम्यान, भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कार्यालयाची काल तोडङ्गोड करण्यात आली. वकिलांच्या एका गटाने ही तोडङ्गोड केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.