केंद्रीय विद्यालयाच्या स्पर्धेत गोमंतकीय खेळाडूंची चमक

0
110

>> राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी ७ खेळाडूंची निवड

केंद्रीय विद्यालय संघटना मुंबईच्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत गोमंतकीय खेळाडूंनी चमक दाखवली. केंद्रीय विद्यालय आयएनएस मांडवी येथे २६ ते २७ एप्रिल रोजी झालेल्या या स्पर्धेत गोव्याच्या ७ खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. भुवनेश्‍वर येथे राष्ट्रीय स्पर्धा होईल. स्पर्धेत गोव्यासह मुंबई, पुणे नाशिक, नागपूर, यवतमाळ येथील केंद्रीय विद्यालयाच्या खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेत एकूण ७५ खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धा १४, १७ आणि १९ वर्षांखालील गटात झाली.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास केंद्रीय संघटनच्या मुंबई विभागाच्या उपायुक्त अरूणा पी. भल्ला, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर, सदस्य संजय बेलुरकर, केंद्रीय विद्यालय मांडवीचे प्राचार्य रवी प्रताप सिंग उपस्थित होते. रवी प्रताप सिंग यांनी स्वागत केले. बांदेकर यांनी शिक्षणासाठी बुद्धिबळ या विषयावर मार्गदर्शन केले. गोव्यात काही शाळांमध्ये बुद्धिबळ खेळाला प्राधान्य दिले जात आहे. शाळेतील मुलांसाठी असा उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भल्ला यांनी केंद्रीय विद्यालय संघटनतर्फे क्रीडा विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शाळेच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सेल्विना मोनिझ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

दरम्यान, स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पदक व प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. स्पर्धा मुख्य आर्बिटर स्वप्नील होबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. गौतमी तारी आणि नारायण वस्त यांनी साहाय्यक आर्बिटरचे काम पाहिले.
स्पर्धेतील गटनिहाय पहिले तीन विजेते : १४ वर्षांखालील (मुले) ः अली अमानत, वास्को (४ गुण), रोहित गावस, वास्को (३ गुण), आयुष नाईक, मांडवी (३ गुण), (मुली) : समीक्षा भापकर, ओझर (४ गुण), शर्लिन सतदेव, अंबरना (३ गुण), मिदिनी वानखे, देऊ रोड (३ गुण). १७ वर्षांखालील मुले : अन्वेश बांदेकर, मांडवी (३.५ गुण), सुश्रुत कागडे, ओझर (३.५ गुण), प्रवीण श्रीरामे, अजनी (३ गुण), मुली : डी मिश्का, वास्को (३.५ गुण), किर्तना एम., मानखुर्द (३ गुण), वष्वानी दाभोडे, आयआयटी पवई (३ गुण)