केंद्रीय वित्तमंत्री जेटली यांची भाकपवर टीका

0
75

केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांनी काल केरळमधील सत्ताधारी भाकप (मार्क्सवादी) सरकारवर जोरदार टीका केली.
भाकप कार्यकर्त्यांनी एका स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची हत्या केल्याचा आरोप असून या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या राजेश या युवकाच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जेटली येथे आले होते.
भाकप कार्यकर्त्यांकडून प्रतिस्पर्धी कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम सुरू असून राज्यात हिंसेचे वातावरण तयार करण्यात येत असल्याचा आरोप जेटली यांनी केला. या प्रकरणी पोलिसांवरही पक्षपातीपणाचा आरोप त्यांनी केला.
केरळात जो हिंसाचार सध्या सुरू आहे. तसाच प्रकार भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये घडला असता तर आतापर्यंत पुरस्कार वापसी सुरू झाली असती असा टोलाही यावेळी जेटली यांनी लगावली
केरळात डाव्या पक्षांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रत्येकवेळी हिंसाचार घडतो. त्यानंतर राजकीय विरोधकांना लक्ष्य करून हत्या केल्या जातात असा गंभीर आरोप त्यांनी केला.
केरळमधील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष देऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.