केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीस लुईझिन, राणे दिल्लीला

0
104

>> उमेदवार निवड, युतीवर शिक्कामोर्तब शक्य

 

कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या आज संध्या. ७ वा. होणार्‍या छाननी समितीच्या बैठकीस हजर राहण्यासाठी काल संध्याकाळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो, विरोधी नेते प्रतापसिंह राणे व त्यांना मदत करण्यासाठी पक्षाचे नेते एम. के. शेख दिल्लीला रवाना झाले. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवड व संभाव्य युतीबाबत यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे.
संभाव्य उमेदवारांची यादी घेवून वरील नेते दिल्लीत गेल्याने हे सर्व उमेदवार, त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांचे लक्ष आजच्या बैठकीकडे असेल. उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर युती व्हावी म्हणून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बाबुश मोन्सेर्रात यांच्या पक्षाबरोबरही युती करण्याच्या प्रस्तावावर विचार होऊ शकेल. वरील पक्षांवर युती केल्यास गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनाही कॉंग्रेसच्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकेल, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.