केंद्राच्या सूचनेनंतरच राज्यातील विविध उद्योग सुरू करणार ः राणे

0
108

केंद्राकडून येणार्‍या सूचना व निर्देशानंतर राज्यातील कोणकोणते उद्योग व सेवा सुरू करणे शक्य आहे त्याचा अभ्यास करून ते उद्योग सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल सांगितले. एका स्थानिक केबल वाहिनीशी बोलताना मंत्री राणे यांनी ही माहिती दिली.

केंद्रिय उद्योग व वाणिज्य मंत्री विविध राज्यांच्या उद्योगमंत्र्यांशी लवकरच संपर्क साधून मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर कोणकोणते उद्योग सुरू करणे शक्य आहे ते स्पष्ट होणार असून केंद्राच्या मार्गदर्शन तत्त्वांनुसार राज्ये पावले उचलणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, येत्या २० एप्रिलपासून सर्व आरोग्य सेवा, मासेमारी (मार्गदर्शक तत्त्वांनुसार) विमा कंपन्यांचे व्यवहार, तेल व वायूशी संबंधित व्यवहार, वीज, टपाल केवा, कचरा व्यवस्थापन, मालवाहू ट्रक, शहरांबाहेरील उद्योग सुरू करता येणार आहेत. तसेच आयटी व आयटीशी संबंधित सेवा (५० टक्के कर्मचार्‍यांसह), ई-कॉमर्स कंपन्या, कुरियर सेवा, तसेच इलेक्ट्रिशन, आयटी दुरूस्ती, प्लंबर्स, मोटर मेकॅनिक आदींना सेवा सुरू करता येणार आहे अशी त्यांनी माहिती यावेळी दिली.