कॅसिनो मधील कामगारांची नावे मतदारयादीप्रश्‍नी अहवाल सादर

0
66

>> मुख्य निवडणूक अधिकार्‍याची माहिती

येत्या २३ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली असून राज्यात ११ लाख ३५ हजार ८१० मतदार आहेत.
निवडणूक कार्यालयाने जानेवारी महिन्यात मतदारयादी जाहीर केली होती. मागील दोन महिन्यात सुमारे ४२०० मतदारांची संख्या वाढली आहे.

उत्तर गोवा मतदारसंघात ५ लाख ५६ हजार ६२५ मतदार आहेत. तर, दक्षिण गोव्यात ५ लाख ७९ हजार १८५ मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी दिली.

पर्वरी येथील कॅसिनोमध्ये काम करणार्‍या कामगारांची मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी अहवाल मुख्य निवडणूक कार्यालयाला सादर केला आहे. या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कॅसिनोमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी ऑन लाइन पद्धतीने मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज पाठविले होते, असेही सावंत यांनी सांगितले.
लोकसभा आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी अकरा हजार सरकारी कर्मचारी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ५ हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. यात केंद्रीय सुरक्षा जवान, आरआरबी आणि स्थानिक पोलिसांचा समावेश आहे, असेही सावंत यांनी सांगितले.