कॅसिनोतील मद्य चोरीप्रकरणी कर्मचार्‍यास अटक

0
117

येथील डेल्टीन जॅक कॅसिनोमधून अंदाजे १ लाख रुपयांच्या मद्याच्या ५० बाटल्या चोरी प्रकरणी कॅसिनोतील कर्मचारी बिटूमन बोरा (२१ वर्षे, मूळ आसाम) याला पणजी पोलिसांनी काल अटक केली.

डेल्टीन जॅक कॅसिनोमधून मद्याच्या बाटल्यांच्या चोरी प्रकरणी प्रितेश चोडणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमिनुल इस्लाम आणि बिटूमन बोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कॅसिनो जहाजातून मद्याच्या बाटल्या कचर्‍यातून बाहेर आणून त्यांची विक्री पणजीतील दारू व्यावसायिकाला केली जात होती, अशी माहिती उघड झाली आहे.

संशयित बिटूपन बोरा हा दाबोळी येथे विमानातून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला. दुसर्‍या संशयिताचा शोध सुरू आहे. कॅसिनोतून चोरण्यात येणार्‍या दारूच्या बाटल्या विकण्यात येणार्‍या मद्य व्यावसायिकाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण देसाई तपास करीत आहेत.