कॅसिनोतील कर्मचार्‍याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करा : कॉंग्रेस

0
108

मंगळवारी रात्री मांडवी नदीतील एका कॅसिनो बोटीतून नदीत पडून एक बाउन्सर बुडून मृत्युमुखी पडण्याची जी घटना घडली त्याची चौकशी होण्याची गरज आहे, अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव र्यानी काल पत्रकार परिषदेत बोलताना केली.

यापूर्वी एक पर्यटकही नदीत पडल्याने बुडून ठार झाला होता असे बुयांव र्यानी सांगितले. कॅसिनो मालर्कानी कॅसिनोत येणार्‍या लोकांच्या सुरक्षिततेकडे जे दुर्लक्ष केलेले आहे त्यात सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचे बुयांव म्हणाले. कॅसिनो बोटींवर जीवरक्षक नेमण्याची त्यांच्यावर सक्ती करायला हवी, असेही ते म्हणाले.
बुडून ठार झालेला बाउन्सर हा आपल्याकडे कामाला नव्हता असे कॅसिनो व्यवस्थापनाने म्हटले असल्याचे सांगून अशा प्रकारे आपला कर्मचारी हा आपला नव्हता असे सांगून जबाबदारी झटकणे हे योग्य नसल्याचे बुयांव म्हणाले. या संपूर्ण घटनेची चौकशी होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.