‘कॅन्डी फ्लीप’ इंग्रजी चित्रपटाचा शुभारंभ

0
144

वास्कोत मंगळवारपासून ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील चित्रपट प्रदर्शनाला सुरूवात झाली असून वास्कोत के सेरा सेरा चित्रपटगृहात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते या चित्रपट प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते.
तर काल या सिनेमागृहात अभिनेत्री कल्की कोयक्लीन यांच्या हस्ते ‘कॅन्डी फ्लीप’ या इंग्रजी चित्रपटाचे प्रदर्शनाचा मुहूर्तमेढ करण्यात आला.
या चित्रपट प्रदर्शनाला यावेळी एनआरबी ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नारायण बांदेकर, नयना बांदेकर तसेच या चित्रपटातील भूमिका वठविलेले प्रशांत प्रकाश, गुलशन देवयह, दिग्दर्शक शहनवाझ यनके, निर्माता बालसुब्रमण्यम, यनसी, सुरेंद्र हेगडे तसेच इतर सहाय्यक उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री कल्की कोयक्लीन यांनी चित्रपटाविषयी माहिती दिली व आपले मनोगत व्यक्त केले.