कृष्णवर्णियाच्या हत्येस जबाबदार पोलिस निर्दोष : अमेरिकेत दंगली

0
89

फर्ग्युसन येथे एका कृष्णवर्णियाच्या हत्येस जबाबदार असलेल्या एका श्वेतवर्णिय पोलिसाला दोषी धरण्यास तेथीलन न्यायालयाने नकार दिल्याने संतप्त झालेल्या जमावांनी अमेरिकेच्या अनेक भागांत दंगली माजवल्या आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये सदर हत्येची घटना घडली होती. १८ वर्षीय मायकेल ब्राऊन याच्यावर गोळी झाडण्याच्या त्या प्रकाराची अमेरिका सरकार चौकशी करील अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली असली, तरी ठिकठिकाणी कृष्णवर्णियांनी न्यायालयीन निवाड्याविरुद्ध जाळपोळ व नासधूस केली. डेरेन विल्सन नामक श्वेतवर्णीय पोलिसाने मायकेलवर गोळीबार केली होती. फर्ग्युसनमध्ये उसळलेल्या दंगलीत पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले. किमान डझनभर इमारतींना आग लावण्यात आली. ङ्गनो जस्टीस, नो पीसफअशा घोषणा देत ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. लॉस एंजिलिसमध्ये दोन दशकांपूर्वी अशाच प्रकारच्या एका घटनेत रॉडनी किंग नामक कृष्णवर्णिय वाहनचालकास मारहाण करणार्‍या पोलिसास न्यायालयाने मुक्त केल्याने दंगली उसळल्या होत्या.