कृषी क्षेत्रातील कौशल्याधारीत अभ्यासक्रम

0
392

– श्रीरंग व्यंकटेश जांभळे

शेती क्षेत्राच्या विकासासाठी संबंधित मनुष्यबळ निर्मितीची आवश्यकता लक्षात घेऊन उद्योग जगतातले तज्ज्ञ श्री. मांगिरीश पै रायकर यांनी सावईवेरे येथे रामनाथ कृष्ण पै रायकर कृषी विद्यालयाची स्थापना २०१३ साली केली. या विद्यालयात उच्च माध्यमिक विभागात कृषी (व्यावसायिक) हा अभ्यासक्रम चालतो.

आता १०वी व १२वीचे निकाल झाले. भविष्यात सुखी जीवन जगण्यासाठी चांगला रोजगार उपलब्ध व्हावा, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम निवडले जात आहेत. त्यातच दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या सर्वानाच पुढे प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण खाते व गोवा विद्यापीठ यांनी आपापल्या परीने तयारी केली आहे. दरवर्षीप्रमाणे जूनच्या दुसर्‍या, तिसर्‍या आठवड्यात राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालये व बहुतांश महाविद्यालये नवोदितांच्या उपस्थितीने गजबजून जातील, शैक्षणिक दैनंदिन रहाटगाडगे सुरू होईल.
तरुणांच्या जीवनात भविष्याला दिशा देणार्‍या या महत्त्वाच्या टप्प्यावर करिअर गाइडन्स, कल चाचणी, अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन या गोष्टींचा आपल्या राज्यात अभाव दिसून येतो. त्यामुळे मित्र, नातेवाईक किंवा शेजारी निवडतो म्हणून किंवा प्रेस्टिज म्हणून एखादा अभ्यासक्रम निवडणे, मनाप्रमाणे मजा करता यावी म्हणून निवड करणे, हे प्रकार सर्रास पहायला मिळतात. ५५% पेक्षा पुढील टक्केवारी मिळाली की ११वीला विज्ञान शाखा किंवा पोलिटेक्नीक निवडणे, सोपे पडते म्हणून कला शाखा निवडणे अशा गोष्टी पहायला मिळतात. यामुळे प्रत्येकाच्या क्षमतेनुसार व भविष्याचा वेध घेऊन अभ्यासक्रम निवडला जातोच असे नाही. याचा परिणाम म्हणून पुढे नापास होणे, कमी मार्क मिळणे, निवडलेली शाखा सोडावी लागणे, अशी पाळी विद्यार्थ्यावर येते. यामुळे त्याचे बरेच नुकसान होते. यासाठी योग्यवेळी योग्य अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक आहे.
कृषी क्षेत्र हे तसे दुर्लक्षीतच. पण हेच क्षेत्र देशात सर्वाधिक रोजगार पुरवणारे क्षेत्र आहे. माणसाच्या नियमित व अत्यावश्यक गरजा (अन्न, वस्त्र, निवारा) पुरवणारे हे महत्त्वाचे क्षेत्र. नवीन जमान्यानुसार या क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. त्यानुसार रोजगाराची उपलब्धताही मोठ्या प्रमाणात आहे. त्याला अनुसरून आपले कौशल्य व क्षमता विकसित केल्यास गोवा राज्यातही अनेक तरुणांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आज अभियांत्रिकी, वैद्यकीय, वकिली यासारख्या अन्य क्षेत्रातील शिक्षण घेऊनही बरेचजण शेतीकडे वळताना दिसतात. शेती क्षेत्राकडे वळणे म्हणजे फक्त नांगर/कुदळ/फावडे हातात घेऊन पिकाची लागवड करणे व उत्पादन घेणे एवढेच नाही तर शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीची निर्मिती व देखभाल, सिंचन व्यवस्था विकसित करणे, शेतीमध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची कमतरता पाहता विविध यंत्रसामग्रीच्या आधारे शेतीतील कामे करून देणे (उदा. नांगरणी, लावणी, फवारणी, काढणी इ.), कृषी बँकिंग, प्रक्रिया उद्योग, विपणन अशा अनेक गोष्टी शेतीच्या विकासासाठी आवश्यक आहेत. अशा सेवांमधे मोठमोठ्या कंपन्याही आता उतरत आहेत. त्यामुळे या रोजगाराच्या संधींचा वेध घेऊन शेतीशी संबंधित अभ्यासक्रम निवडणे फायदेशीर ठरू शकते. गोव्यात आजच्या घडीला अशा क्षेत्रातील रोजगाराची उपलब्धता शेकड्यांच्या घरात नक्कीच आहे व ती वाढत आहे.
शेती क्षेत्राच्या विकासासाठी संबंधित मनुष्यबळ निर्मितीची आवश्यकता लक्षात घेऊन उद्योग जगतातले तज्ज्ञ श्री. मांगिरीश पै रायकर यांनी सावईवेरे येथे रामनाथ कृष्ण पै रायकर कृषी विद्यालयाची स्थापना २०१३ साली केली. या विद्यालयात उच्च माध्यमिक विभागात कृषी (व्यावसायिक) हा अभ्यासक्रम चालतो. यात गोवा बोर्ड अथवा अन्य राज्यातील बोर्डातून १०वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तसेच मुक्त विद्यालयातून १०वी उत्तीर्ण विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम गोवा बोर्डाशी संलग्न असून गोवा शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून मान्यताप्राप्त आहे. या अभ्यासक्रमात ११वी व १२वीला फळपिके, भाजीपाला लागवड, पुष्पशेती, बाग सजावट असे विषय शिकवले जातात. या अभ्यासक्रमात २/३ भाग प्रात्यक्षिक व १/३ भाग सैध्दांतिक अशी विभागणी असल्याने विद्यार्थ्यांना विषय समजून घेणे व परीक्षेच्या दृष्टीनेही सोपे जाते. दहावीनंतर अन्य शाखेत प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना तेथील अभ्यासक्रम कठीण गेला. अशा काही विद्यार्थ्यांनी नंतर कृषी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन आपली बारावी यशस्वीपणे पूर्ण केल्याची काही उदाहरणे आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या काही विद्यार्थ्यांना ओल्ड गोवा येथील खउअठ, कृषी खात्याच्या अढचअ या प्रकल्पात तसेच झुआरीसारख्या शेतीशी संबंधित कंपन्यांतून रोजगार मिळाला आहे. काहीजण बागकाम, भाजीपाला लागवड अशा व्यवसायात उतरले आहेत.
या अभ्यासक्रमातून पुढे येऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी सन २०१६ पासून केंद्र सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गोवा विद्यापीठाशी संलग्न कम्युनिटी कॉलेज ही संकल्पना राबवताना याच विद्यालयात कृषी विषयातील डिप्लोमा व ऍडव्हान्स डिप्लोमा असा २ वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. १२वी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. याचे तिसरे वर्ष- अर्थात पदवी पुढील वर्षापासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच हा पदवी अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी प्रात्यक्षिके व इंटर्नशीपचा फार चांगला उपयोग होतो. पिकांची लागवड, सिंचन व्यवस्था, माती परीक्षण, पिक संरक्षण, सेंद्रिय शेती, रोपवाटिका, ग्रीन हाउस तंत्रज्ञान, कृषी बँकिंग अशा शेतीच्या विविध आयामांचे प्रात्यक्षिक ज्ञान (िीरलींळलरश्र ज्ञपेुश्रशवसश) विद्यार्थी अवगत करू शकतो. असे कुशल तरुण कृषी क्षेत्रातील विकासाचे नेतृत्व करू शकतील.
अशा या कौशल्याधारीत अभ्यासक्रमाचा विद्यार्थी व पालकांनी उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने नक्कीच विचार करावा. संपर्क ः ९६७३७५११२५
दूरध्वनी ः ०८३२-२३४००७७