कूकच्या आवडत्या खेळाडूंमध्ये कोहली

0
160

इंग्लंडचा विश्‍वविक्रमी कर्णधार ‘सर’ ऍलिस्टर कूक यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या आवडत्या खेळाडूंपैकी एक असल्याचे म्हटले आहे. कूक यांनी कोहलीची तुलना विंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याच्याशी केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम दृष्टिपथात असताना कूक यांनी २०१८ साली निवृत्ती स्वीकारली होती.

कूक यांनी सांगितले की मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या वेस्ट इंडिज दौर्‍यारम्यान लाराच्या वर्चस्वामुळे कूक हे अस्वस्थ झाले होते. अरुंदेल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत सायमन जोन्स, मॅथ्यू होगार्ड, मिन पटेलसारखे खेळाडू आमच्याकडे होते. परंतु, लाराचा अलौकिक खेळ पाहून स्तब्थ झाला होतो, असे कूक यांनी सांगितले. लाराने दुपारच्या आणि चहाच्या दरम्यान शतकी खेळी केली ज्यामुळे मला जाणवले की मी मी एक वेगळ्याच स्तरावरील अत्युत्तम फलंदाजी पाहत आहे. लाराने १३१ कसोटी सामन्यात ११,९५३ धावा तर २९९ एकदिवसीय सामन्यात १०५०५ धावा केल्या आहेत.
कूकने लाराच्या अलौकिक फलंदाजीशी जवळीक साधणार्‍या चार क्रिकेटपटूंची नावे सांगताना भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा सर्वांत यशस्वी कर्णधार रिकी पॉंटिंग, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस व श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा यांची नावे घेतली. कूक यांनी कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये १६१ कसोटी सामन्यांत सर्वाधिक १२,४७२ धावा केल्या आहेत. क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कूक यांना मागील वर्षी इंग्लंडचा राणी व्हिक्टोरिया यांच्या हस्ते ‘सर’ ही पदवी देण्यात आली होती. इयान बोथम (२००७) यांच्यानंतर ‘सर’ पदवी मिळालेला कूक इंग्लंडचा केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला होता.