कुलभूषण जाधवच्या आडून पाकिस्तानची खेळी

0
123
  • शैलेंद्र देवळाणकर

पाकिस्तानने भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी व उद्योगपती कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली आहे. मात्र, यामागेही त्याचा कुटिल डाव आहे आणि तो ओळखून भारताने सावध राहिले पाहिजे…

भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव काही महिन्यांपूर्वी व्यवसायानिमित्त इराणमध्ये गेले असता तेथून पाकिस्तानमधील आयएसआय या गुप्तचर संस्थेकडून त्यांचे अपहरण कऱण्यात आले. त्यांना गुप्तहेर ठरवून पाकिस्तानने मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तयारी केली होती. मात्र त्याला भारताने कडाडून विरोध केला. भारतासाठी आणि कुलभूषण जाधव यांच्यासाठी कालचा २५ डिसेंबर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. कारण जाधव यांना अटक केल्यानंतर तब्बल २१ महिन्यांनी काल त्यांच्या पत्नी आणि आई यांना जाधव यांची भेट घडली. या भेटीसाठी त्या दोघीही पाकिस्तानात पोहोचल्या होत्या. त्याचबरोबर जाधव यांना भारताच्या उपउच्चायुक्त यांनादेखील भेटण्याची परवानगी देण्यात आली. त्या दृष्टीकोनातून हा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. या घडामोडींकडे भारताचा अंशतः राजनैतिक विजय या दृष्टीने पाहिले पाहिजे.

२५ डिसेंबर २०१७ या दिवशी जगभरात ख्रिसमसचा उत्साह साजरा होतो. त्याचबरोबर या दिवशी मोहम्मद अली जिना यांचा जन्मदिन असतो. त्यामुळे पाकिस्तानने हा मुहूर्त साधला असावा. मात्र यामागे पाकिस्तानचा काही वेगळा इरादा आहे का, पाकिस्तान काही राजकीय डावपेच खेळत नाही ना, ही भेट घडवून आणून पाकिस्तान धूळङ्गेक करत नाही ना, आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पाकिस्तानने ह्या भेटीला परवानगी कशी दिली याचा विचार करावा लागेल.
कुलभूषण जाधव यांना इराणमधून पकडण्यात आले असूनही पाकिस्तान मात्र त्यांना बलुचिस्तानमधून पकडण्यात आल्याचे सांगत आहे. बलुचिस्तानमध्ये घातपाती कारवाया करणे आणि सुमारे ४२ अब्ज डॉलर्स खर्चून विकसित करण्यात येत असलेल्या चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉरला धोका पोहोचवणे असे आरोप जाधव यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. कुलभूषण जाधव हे गुप्तहेर आहेत आणि बलुचिस्तानमधील ङ्गुटीरतावादी लोकांना मदत करून पाकिस्तानविरोधात कटकारस्थान करण्यासाठी ते बलुचिस्तानात आले होते असा आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पहिल्यांदाच बलुचिस्तानचा उल्लेख केला होता. बलुचिस्तान सुरू असलेल्या स्वातंत्र्यसंघर्षामध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे म्हटले होते. किंबहुना, भारत आता बलुचिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्यांना आपल्याकडे बोलावण्याच्या परिस्थितीत आहे आणि त्यांना पाठिंबाही जाहीर केला आहे. बलुचिस्तानमधील ङ्गुटिरतावादी चळवळीला भारताचा पाठिंबा असल्याचा आरोप पाकिस्तान सुरुवातीपासूनच करत आला आहे. मोदी यांच्या भाषणानंतर पाकिस्तानने हा मुद्दा आणखी उचलून धरला आणि जाधव यांचा संदर्भही त्यांनी बलुचिस्तानशीच जोडला. जाधव हेे गुप्तहेर आहेत असे मानून पाकिस्तानने जाधव यांना थेट ङ्गाशीची शिक्षा ङ्गर्मावली होती. भारताने याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. या न्यायालयामध्ये ऍड. हरिष साळवी यांनी सक्षमपणे भारताची बाजू मांडली होती. त्यातूनच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने अंतरिम निर्णय दिला. अंतिम निर्णय व्हायचा आहे. अंतरिम निर्णयामध्ये दोन मुद्दे न्यायालयाने सांगितले आहेत. एक म्हणजे भारताच्या मागणीनुसार जाधव यांची ङ्गाशी रद्द करणे आणि पाकिस्तानने दूतावासाशी संपर्क करु देण्याची अनुमती देणे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण होता आणि तो संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य असल्यामुळे पाकिस्तानसाठी तो बंधनकारकही होता. या निकालामुळे आंतरराष्ट्रीय जनमत पाकिस्तानच्या विरोधात गेले होते. जाधव यांच्या अटकेमागे पाकिस्तानचेच काही कटकारस्थान आहे की काय असे संशयाचे वातावरण जगामध्ये निर्माण झालेले होते. या खटल्याची अंतिम सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानने हा अंतरिम आदेश पाळणे महत्त्वाचे होते. दरम्यानच्या काळात ही भेट घडून आली आहे. या भेटीमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की कुलभुषण जाधव हे अद्याप जिवंत आहेत. मात्र ही भेट घडवून आणून त्यातून पाकिस्तान काही डाव साधण्याची शक्यता आहे. ही भेट सर्वच प्रसार माध्यमांसमोर झाली आहे. ती चित्रीत करण्यात आली आहे. असे करण्यातून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यापुढे कशी मान तुकवतो हे दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करील यात शंका नाही. वास्तविक पाहता, व्हिएन्ना ऍग्रीमेंट ऑन कॉन्सिलर ऍक्सिस ह्या करारातील कलम ३० नुसार एखादा देश दुसर्‍या देशातील नागरिकाला आपल्या देशातील तुरुंगात टाकतो त्यावेळी त्याला वकिलातीशी किंवा देशातील दूतावासाशी संपर्क करण्याची परवानगी दिली जाते. या आरोपात तथ्य आहे का, त्यांना कशी वागणूक दिली जात आहे आणि दोषारोप पत्र दाखल केलेले आरोपीला मान्य आहे का या सगळ्या गोष्टींची तपासणी दूतावासाद्वारे केली जाते. जाधव यांची कुटुंबियांशी भेट घडवून आाणणारा पाकिस्तान ह्या गोष्टी सातत्याने नाकारत आहे. पाकिस्तानच्या मतानुसार त्यांच्या देशाविरोधात कटकारस्थान करणार्‍या किंवा हेरगिरी करणार्‍याला दूतावासाशी संपर्क करु देता येत नाही. मात्र पाकिस्तान हा व्हिएन्ना कराराचा सदस्य आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वैयक्तिक मत अवलंबणे हे या कराराचा भंग आहे. मात्र तरीही पाकिस्ताननेे आडमुठे धोरण स्वीकारले आहे. आता जाधव यांना पत्नी आणि आईला भेटण्याची परवानगी देऊन स्वतःची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे. मात्र त्याबाबतही काही धोक्याच्या शक्यता आहेत.

मागील काळात जाधव यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानने त्यांचा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. तो व्हिडिओ मॉर्ङ्गिंग किंवा छेडछाड करून करण्यात आला होता. आतही जाधव यांच्या कुटुंबियांसमावेतच्या व्हिडिओत ङ्गेरङ्गार करण्यात येऊ शकते. त्या आधारे आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तान नवा युक्तीवाद करू शकतो. म्हणूनच भारताने आता प्रतिवादासाठी सज्ज असणे आवश्यक आहे. जाधव यांना संपूर्ण न्याय मिळाला आहे असे अद्यापही म्हणता येत नाही. येणार्‍या काळात भारताला पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात युक्तिवाद करावा लागणार आहे. तसेच जाधव यांच्या ङ्गाशीला स्थगिती मिळण्यासाठी आणि दूतावासाशी संपर्क करु देण्यासाठीच्या मागणीतही सातत्य ठेवावे लागणार आहे, कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयातील सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पाकिस्तान हे अत्यंत अविश्‍वासार्ह, धूर्त आणि सातत्याने कोलांटउड्या मारणारे राष्ट्र आहे. त्यामुळे या भेटीमागे पाकिस्तानच्या कूटनीतीचा डाव ओळखावा लागेल.