कुर्टीतील युवकाची  गळफासाने आत्महत्या

0
104

हवेली-कुर्टी येथील अक्षय दुर्गानंद देसाई या २१ वर्षे वयाच्या युवकाने घरातील फॅनला दुपट्टा बांधून गळफास लावून आत्महत्या केली. अक्षय याने केटरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता व तो बेकार होता. निराशेपोटीच त्यांनी हे कृत्य केले असावे असा कयास आहे. आई, वडिल व एक भाऊ असे हे कुटुंब मूळ काणकोणचे, कामानिमित्त ते फोंड्यात राहत होते. फोंडा पोलिसानी पंचनामा केला व उत्तरीय तपासणीनंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.