कुडचड्यातील अपघातात २५ जखमी

0
78

>> स्कूल बस कलंडल्याने दुर्घटना

 

शेळवण-कुडचडे येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या बसला काल दुपारी २ वा. अपघात होऊन त्यात २५ विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी १२ जणांना इस्पितळात उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, शेळवण-कुडचडे येथे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस क्रमांक जीए ०१-झेड-६९०६ या क्रमांकाच्या बसचे ब्रेक निकामी होऊन ती कलंडल्याने त्यातील २५ मुले जखमी झाली.
काल दुपारी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन सदर बस कुडचडेहून शेळवण येथे जात होती. यावेली बसमध्ये २५ मुले होती. शेळवण येथील चढणीवर पोचल्यानंतर बसचे ब्रेक निकामी झाल्याचे वाहक उदेश शांताराम नाईक यांच्या लक्षात आले व त्यांनी मुलांना सदर घटनेची कल्पना देऊन घट्ट राहण्यास सांगितले व प्रसंगावधान राखून त्यांनी बस कडेला नेली. त्यामुळे संकट किरकोळ दुखापतींवर निभावले.
अपघातानंतर लोकांनी १०८ क्रमांकाला दूरध्वनी करून मुलांना सरकारी आरोग्य केंद्रात दाखल केले. काही मुलांच्या हातांना, पायांना व डोक्याला किरकोळ जखमा झाल्या. तर काहींना मुका मारही बसला आहे. मुलांना इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे समजल्यानंतर न्यू एज्युकेशनल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुहास प्रदीप काकोडकर यांनी तसेच इतर हायस्कूलच्या शिक्षकांनी इस्पितळात धाव घेतली. यापैकी चार मुलांना एक्स रे साठी मडगाव इस्पितळात पाठवण्यात आले. चिराग देसाई, गौरवी देसाई, मेघश्याम देसाई, ङ्गिया ङ्गर्नांडिस अशी मडगावला पाठवलेल्यांची नावे आहेत. काहीजणांना उपचारार्थ काकोडा आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहे. तर काहींना प्रथमोपचारानंतर घरी पाठवण्यात आले. शेळवणचे सरपंच दयानंद नाईक, माजी आमदार शाम सातार्डेकर आदींनीही मुलांची चौकशी केली.