किशोरांमधील ताण-`

0
322

– डॉ. सुषमा किर्तनी, शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ
काय आहे ‘ताण’?
ताण ही जीवशास्त्रीय आणि जैवरासायनिक प्रक्रिया आहे जी मेंदूमध्ये सुरू होते आणि मज्जातंतूद्वारे सर्व शरीरात पसरून हॉर्मोन उत्पन्न करते आणि त्यामुळे त्याचा परिणाम शरीराच्या रोगप्रतिबंधक यंत्रणेवर होतो.
आता खरे तर ताण म्हणजे…
१) बाहेरील किंवा शरीराच्या आतील उद्दिपकांमुळे व्यक्तीला काहीतरी बदल जाणवतो.
२) एखाद्या व्यक्तीच्या अंगावर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदार्‍या आणि कामं पडतात तेव्हा त्याच्यावर ताण येतो.
३) शरीराची होणारी झीज (वेअर अँड टेअर) म्हणजेच ताण होय.
४) ताण म्हणजे एखादे सर्वसाधारण कार्य जे व्यक्तीच्या अंगावर येऊन पडते मग ते सुखाचेही असू शकते किंवा दुःखाचेही असू शकते.
ताण जर एकसारखा असेल आणि त्यामुळे शरीरात कायमचे बदल होणार असतील तर तो आरोग्यास धोकादायक ठरू शकतो. ताणामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे, स्नायूंच्या नसांचे, श्‍वसनाचे आणि ऍलर्जीचे विकार, प्रतिकारसंस्थेचे, पचनसंस्थेचे, त्वचेचे आणि दातांचे विकार होऊ शकतात. ताणांचे प्रकार :
१. शारीरिक, २. मानसिक व ३. मनोसामाजिक.
१. शारीरिक ताणामध्ये पर्यावरणातील ताणांचा समावेश आहे. किशोरांना शाळेत किंवा कॉलेजमध्ये दिवसभर बाकांवर बसावे लागते, गर्दीच्या बसेसमध्ये प्रवास करावा लागतो, वातावरणातील प्रदूषणाला सामोरे जावे लागते.
२. मानसिक ताणामध्ये शाळेतील शिक्षक आणि घरातील पालक सतत अभ्यासासाठी त्यांच्या मागे लागत असतात, त्याचा समावेश आहे.
३. जेव्हा की मनोसामाजिक ताणामध्ये किशोरांचे परस्परांमधील नातेसंबंध, वाद किंवा कुटुंबातील सदस्य किंवा मित्रासोबत झालेले मतभेद यामुळे ताण येतो. माध्यमं आणि इंटरनेट हे किशोरवयीन मुले काय आहेत आणि काय बनू पाहतात याविषयी तीव्र मतभेद निर्माण करतात.
सर्वसाधारणपणे ताणांचे दोन प्रकार आहेत-
-+“` सकारात्मक ताण जो आपल्याला दैनंदिन जीवनातील व्यवहार करण्याची प्रेरणा देतो.
२. डिस्ट्रेस – क्लेश किंवा त्रास – व्यक्ती किंवा कुटुंबाकडून असणार्‍या अपेक्षा आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता यांच्यामधील असंतुलनामुळे ताणाची निर्मिती होते.
किशोरांनी ताणाच्या व्यवस्थापनाची कला शिकून घ्यावयास हवी. जागतिक आरोग्य संघटनेचा जीवन कौशल्ये प्रशिक्षण कार्यक्रम शाळेत किंवा महाविद्यालयात किंवा त्यांच्या वर्गात गेले तर किशोरवयीन मुली-मुलींना ताणाला कसे सामोरे जावे हे शिकता येते.
ताण आणि पौगंडावस्था :
पौगंडावस्था ही मुले आणि पालक दोघांसाठीही खूप जास्त तणावाची अवस्था आहे. पालक म्हणून तुमचा मुलगा या ताणाचा सामना कसा करतो त्याचे निरीक्षण करा व अनुभवाने तो कसा सक्षम होतो ते पहा. अर्थात त्यांना मदत न करता हा संघर्ष फक्त दुरून पाहणे तुमच्यासाठी दुःखदायक असू शकेल. पालक किशोरांचा ताण पूर्णपणे नष्ट करू शकत नाही पण त्यांना जास्तीत जास्त आधार देऊ शकतात.
हा ताण त्यांच्या शरीरातून, कुटुंबातून, शाळा, मित्रांच्या गटातून किंवा समाजातून कुठूनही येऊ शकतो.
१) जीवशास्त्रीय ताण : सर्वसाधारणपणे मुलींमध्ये १२ ते १४ आणि मुलांमध्ये १३ ते १५ या वयात असताना शारीरिक बदल त्यांना अचानक जाणवू लागतात आणि त्यामुळे ते खूप संकोची बनतात व त्यांना वाटतं सगळे लोक नेहमी आपल्याचकडे बघत आहेत. अगदी एखादा छोटासा मुरूम, गडद त्वचा, केस गळले तरी त्यांना त्या गोष्टीचा ताण येतो किंवा ती अतिशय काळजीची बाब वाटते. सतत शाळा-कॉलेजच्या व्यस्ततेमुळे, आणि पालकांच्या दबावामुळे व वाढत्या सामाजिक स्पर्धेमुळे त्यांच्या शरीराची झोपेची गरज वाढते. त्यामुळे त्यांची झोप कमी होते व त्याचाही ताण त्यांना जाणवतो.
२) कौटुंबिक ताण – अगदी सहज तडजोड करणारा किशोरसुद्धा पालकांशी असलेल्या नातेसंबंधांवरून बरेचदा तणावात असतो. किशोर हा स्वावलंबी बनू इच्छितो तसेच पालकांनी त्याची काळजी घ्यावी असेही त्यास वाटत असते. त्यामुळे तो सतत संघर्षाचा सामना करत असतो.
३) शाळेचा ताण – शाळेत जाण्याविषयी, शाळा बदलल्यामुळे, छळणार्‍या मुली, शिक्षकांशी मतभेद, वर्गमित्रांशी मतभेद, कमी गुण मिळणे, परीक्षेत नापास होणे, शिक्षणासंबंधी विकार, पालकांचा दबाव, स्पर्धांचा ताण इत्यादी.
४) सामाजिक ताण – किशोरवयीन हे जास्त तरुण समाजामध्ये गणल्या जात नाहीत. ते मतदान करू शकत नाही तसेच कायद्याने अल्कोहोल विकत घेऊ शकत नाहीत किंवा चांगले उत्पन्न मिळणार्‍या कामांपासून त्यांना दूर ठेवलं जातं. ते ओळखतात की समाजात सगळ्यात जास्त समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. तसेच युद्ध, प्रदूषण, वैश्‍विक उष्णता, अनिश्‍चित अर्थव्यवस्था आणि या सगळ्या ताणांना त्यांना सामोरे जावे लागते.
इतर ताणांमध्ये निकृष्ट आहार, अपुरा पौष्टिक आहार, धूम्रपान, दारूचे व्यसन, निद्रानाश, बेकायदेशीर ड्रग्जचा वापर इत्यादींचा समावेश आहे.
समवयस्क मुला-मुलींचा दबाव व ताण : 
किशोर हे आपल्या बरोबरीच्या मुला-मुलींमध्ये म्हणजेच मित्र-मैत्रिणींमध्ये राहण्यास इच्छुक असतात. ते त्यांचा जास्तीत जास्त वेळ पालकांच्या संमतीशिवाय त्यांच्यासोबत घालवतातही. ते त्यांच्या पालकांपासून दूर गेल्यामुळे ते मित्रांशी जोडलेले राहतात व स्वतंत्र असतात व स्वतःची स्वतंत्र ओळख तयार करू इच्छितात. किशोरांमधील ताण सकारात्मक असो किंवा नकारात्मक, तुमच्या मुलांच्या बाबत असेल तर तुमच्यासाठी गंभीरच ठरतो. जरी पालकांना हे आवडेल किंवा नाही आवडणार पण तुमच्या किशोरांसाठी त्यांच्या मित्रांच्या शब्दाला तुमच्या शब्दांपेक्षा जास्त किंमत असते, हे मान्य करावेच लागेल.
निरोगी मैत्री करण्याची आणि ती टिकवण्याची क्षमता त्या किशोराच्या स्वतःच्या स्वतंत्र ओळखीवर, आत्मविश्‍वास आणि स्वाभिमानावर अवलंबून असते आणि ते सकारात्मक व आदर्श म्हणून वागतात. ते समाजात योग्य तसेच वागतात. ते नैराश्य, आव्हानं आणि स्वतः किशोर असल्याचा स्वीकार करतात, ऐकतात आणि त्यानुसार विचार करतात.
मित्रांचा नकारात्मक दबाव :
स्वीकारणे, संमती देणे आणि आपलं समजणे या गोष्टींची किशोरवयात फार गरज असते. ज्या किशोरांना एकाकी वाटतं किंवा आपण मित्रांना व कुटुंबीयांना नकोसे आहोत असं वाटतं अशी मुले समूहामध्ये राहण्यास धोकादायक ठरण्याची शक्यता जास्त असते. किंवा हा दबाव जर जास्त तीव्र असेल तर मुलांना बरेचदा मनाविरुद्धही वागावं लागतं आणि त्यामुळेच त्या गोष्टींचा त्यांच्यावर ताण येतो. (क्रमशः)