किवीज संघात गप्टिल परतला

0
119

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी न्यूझीलंड संघात सलामीवीर मार्टिन गप्टिल याचे पुनरागमन झाले आहे. १३ सदस्यीय संघात मिचेल सेंटनर व टॉड ऍस्टल या दोन फिरकीटूंनादेखील जागा देण्यात आली आहे.

मालिकेतील पहिला सामना ६ जानेवारीला वेलिंग्टन येथे व दुसरा सामना नील्सन येथे होणार आहे. मागील महिन्यात झालेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या दोन वनडे सामन्यांत अर्धशतके लगावूनही जॉर्ज वर्कर याला गप्टिलसाठी जागा खाली करावी लागली आहे. वडिलांच्या निधनामुळे विंडीजविरुद्धच्या मालिकेला मुकलेल्या कॉलिन डी ग्रँडहोम याचा पहिल्या दोन सामन्यांसाठी विचार करण्यात आलेला नाही. शेवटच्या तीन सामन्यांसाठी त्याची निवड अपेक्षित आहे.

न्यूझीलंड संघ ः केन विल्यमसन, टॉड ऍस्टल, डग ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेन्री, टॉम लेथम, कॉलिन मन्रो, हेन्री निकोल्स, मिचेल सेंटनर, टिम साऊथी व रॉस टेलर.