किनारी व्यवस्थापन आराखडा विलंबाची कारणे द्या : कॉंग्रेस

0
96

राज्याचा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. सरकारने आराखडा तयार करण्यात विलंब का झाला याची कारणे जाहीर करावीत, अशी मागणी गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी कॉँग्रेस भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.

एनजीटीच्या किनारी भागातील बांधकाम बंदीमुळे मच्छीमारी समाजासमोर संकट निर्माण झाले आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्याबाबत योग्य सूचना २०११ मध्ये दिलेल्या असतानाही राज्य सरकारला हा आराखडा वेळेवर सादर करता आला नाही, असे नाईक यांनी सांगितले. कॉँग्रेसच्या कार्यकाळात तत्कालीन पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी काणकोण व इतर भागाचा दौरा केल्यानंतर किनारी भागात मच्छीमारी समाजासाठी आवश्यक साधन सुविधा असलेला आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली होती. राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत प्रारूप आराखडा सादर करून किनारी भागातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी नाईक यांनी केली.