कासावली ग्रामसभेत ‘मोप’ला विरोध

0
88

मोप आंतरराष्ट्रीय प्रकल्पा विरुध्दचा दक्षिण गोव्यातील लोकांचा विरोध पुन्हा जोर धरू लागला असून काल कुठ्ठाळी मतदारसंघातील कांसावली पंचायतीच्या ग्रामसभेत या विषयावर गंभीरपणे चर्चा होऊन सुमारे ५० सदस्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मोप विरोधी निवेदन सादर करण्याचे ठरविले आहे. दाबोळी विमानतळ चालू ठेवून मोप विमानतळ उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी प्रत्यक्षात दाबोळी विमानतळ चालू ठेवून मोपसाठी गुंतवणूक करण्यास कोणीही राजी हेणार नाही, अशी अनेकांची भावना आहे. असे असले तरी सरकारने मोप उभारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. वन आणि पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाणा यांचा मोप प्रकल्पास विरोध आहे. त्यांच्या विरोधाचे काय होईल हे येणारा काळच ठरवू शकेल. पर्रीकर सरकार नव्या विमानतळाच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे प्रकल्प उभारण्यासाठीच्या कामास त्यांनी चालना दिली आहे.