कारवारमधील अपघातात पती-पत्नी ठार

0
156

>> दोन जखमी मुले गोमेकॉत दाखल

राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर काल सोमवारी दुपारी कारवार येथे जीए -०८,ई ८१६४ या चारचाकी वाहनाने एका लॉंरीला धडक दिल्याने कुमठा, कारवार येथील वाहन चालक विष्णू एम. नाईक व त्यांची पत्नी कुंदा नाईक हे जागीच ठार झाले.
गाडीत असलेली त्यांची मुले वैष्णवी व सानवी जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. विष्णू ओरली कोलवा येथे राहत होते. तेथे असलेल्या लिला बीच रिसॉर्टमध्ये ते काम करीत होता.

काल सकाळी ते आपल्या मूळ गावी कुमठा येथे जात असताना हा अपघात घडला. या अपघातात नाईक यांच्या जीए ०८-ई-८१६४ या कारचा चक्काचूर झाला. उभयतांचे मृतदेह कारवार पोलिसांनी ताब्यात घेतले.