कारवारच्या आमदारास दुसर्‍यांदा समन्स जारी

0
107

गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास तपास पथकासमोर खाण घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी कारवारचे अपक्ष आमदार संतीश सैल काल अनुपस्थित राहिले. आमदार सैल यांना शुक्रवार १३ एप्रिल रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी दुसरा समन्स काल जारी करण्यात आला आहे.

एसआयटीने बहुचर्चित खाण घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी कारवारचे अपक्ष आमदार संतीश सैल यांना सोमवारी सकाळी ११ वाजता रायबंदर येथील कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावला होता. आमदार सैल यांनी पूर्व नियोजित कामकाजामुळे चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही, असे एसआयटीच्या चौकशी अधिकार्‍यांना कळविले आहे. त्यामुळे सैल यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी दुसर्‍यांदा समन्स जारी करण्यात आले आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

राज्यातील २००७ ते २०१२ या काळातील कोट्यवधी रुपयांच्या खाण घोटाळा प्रकरणाच्या तपासात कारवारचे अपक्ष आमदार सैल याचा सहभाग असल्याची माहिती परराज्यातील खनिज व्यावसायिकाकडून मिळाली आहे.