तिळामळ, केपे येथे काल सकाळी एका बारच्या बाजूला नॅनो गाडीत बोपरमोर्ड्डा येथील रिगन त्रावासो (३१) या युवकाचा मृतदेह सापडला. या प्रकारामुळे या भागात खळबळ माजली आहे.
रिगन त्रावासो हा बोपरमोर्ड्डा येथील बारमध्ये रविवारी रात्री दारू पिण्यास गेला होता. मात्र, सकाळी नॅनो गाडीत त्याचा मृतदेह सापडला. यामुळे या भागात हा विषय चर्चेचा बनला आहे. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्रावासो याच्या अंगावर जखमा नसल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले आहे. जास्त दारू प्याल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरीश देसाई अधिक तपास करीत आहेत.