काबूलमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात ६३ जण ठार

0
116

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी रात्री झालेल्या आत्मघाती बॉम्ब स्ङ्गोटात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. या स्ङ्गोटाची तीव्रता इतकी मोठी होती की १००हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

काबूलमधील पश्‍चिमेकडील दुबई शहरात एका हॉलमध्ये लग्न समारंभासाठी एक हजारहून अधिक लोक उपस्थित असताना हा बॉम्बस्ङ्गोट घडवण्यात आल्याची माहिती आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्ङ्गोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. काबूलमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी गृह मंत्रालयाच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार रात्री ११.४० वाजता) हा बॉम्बस्ङ्गोट झाला. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे, अशी माहिती अङ्गगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटामागे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. या भागात अल्पसंख्याक शिया हजारा समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात.

अङ्गगाणिस्तानमधून पाकिस्तानी सैन्य माघारी घेण्यासंदर्भात सध्या तालिबान आणि अमेरिकन प्रशासनामध्ये वाटाघाटी सुरू आहेत. सैन्य माघारी घेण्याच्या मोबदल्यात तालिबानने अमेरिकेचा पाठिंबा असणार्‍या स्थानिक सरकारला पाठिंबा द्यावा, असा अमेरिकेचा आग्रह आहे. त्यामुळे काबूलमधील स्ङ्गोटामागे याचा काही संबंध आहे का, याचा तपास घेतला जात आहे.