कांदोळी, सिकेरी किनार्‍यांवर जेलीफीशमुळे सतर्कतेचे आदेश

0
134

दृष्टीच्या जीवरक्षकांना उत्तर गोव्यातील कांदोळी ते सिकेरी समुद्र किनार्‍याच्या टप्प्यात जेलीफिशच्या खुणा आढळून आल्या असून स्थानिक तसेच पर्यटकांना वरील भागातील समुद्रात उतरू नये, अशी सूचना केली आहे. जेलीफिश समुद्र किनार्‍यावर किंवा पाण्यास असू शकतात, असा इशारा दिला आहे.

दृष्टीच्या जीवरक्षकांना दि. २९ डिसेंबरला समुद्र किनार्‍यावर फेरफटका मारताना जेलीफिशच्या खुणा आढळून आल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर गोव्यातील समुद्र किनार्‍यावर जेलीफिशच्या खुणा आढळून आल्याने घबराट पसरली आहे. दृष्टी मरीनने याबाबत माहिती पर्यटन खात्याला दिली आहे. तसेच या समुद्र किनार्‍यावर येणार्‍या पर्यटकांना जेलीफिशबाबत सतर्क केले जात आहे.
जेलीफिश घातक असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जीवरक्षकांकडून केले जात आहे. कांदोळी ते सिकेरी या टप्प्यात एखाद्याला जेलीफीशचा संपर्क आल्यास त्वरित जीवरक्षक किंवा जीवरक्षक टॉवरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी दक्षिण गोव्यातील काही समुद्र किनार्‍यांवर जेलीफिशच्या खुणा आढळून आल्या होत्या.