कांदोळीत २ विद्यार्थी बुडाले

0
126

अहमदाबाद (गुजरात) येथून अभ्यास दौर्‍यावर गोव्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या गटातील एका विद्यार्थिनीसह दोघा विद्यार्थ्यांचा कांदोळी येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. अनुजा सुसान (२३) व गुरेम साई (२५) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. सदर दुर्घटना काल पहाटेच्या वेळी घडली. एका आठवड्यात पर्यटक बुडण्याची ही तिसरी घटना आहे.
अहमदाबाद येथील मदुराई इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेश कॉलेजच्या ४७ विद्यार्थ्यांचा गट शिक्षकांसह गोवा अभ्यास दौर्‍यावर आला होता. त्यांपैकी सहा जण काल पहाटे साडेतीनच्या दरम्यान कांदोळी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. त्यावेळी अनुजा सुसान व गुरेम साई पाण्याच्या जोरदार लाटांबरोबर पाण्यात आत ओढले गेल्याने बुडाले असे कळंगुट पोलिसांनी सांगितले.