कांगारू उपांत्य फेरीत

0
132

इंग्लंडचा ३१ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने अंडर १९ क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. १२७ धावांचा यशस्वीपणे बचाव करताना ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा डाव ९६ धावांत संपवला. केवळ ३५ धावांत तब्बल ८ बळी घेणारा लेगस्पिनर लॉईड पोप सामन्याचा मानकरी ठरला. विजयासाठी १२८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने बिनबाद ४७ अशी मजल मारली होती. परम उप्पलने एक गडी बाद केला. तत्पूर्वी, इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा डाव ३३.३ षटकांत १२७ धावांत संपवला. त्यांच्या इथन बांबर, डिल्लन पेनिंग्टन व विल जॅक्स यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. काल लिंकन येथे झालेल्या नवव्या स्थानासाठीच्या प्ले ऑफ उपांत्यपूर्व फेरीत वेस्ट इंडीजचा ४ गडी व १० चेंडू राखून पाडाव केला. तर दिवसातील दुसर्‍या प्ले ऑफ लढतीत (नववे स्थान) श्रीलंकेने केनियाला ३११ धावांनी हरविले. या सामन्यात लंकेकडून हसिथा बोयागोडा याने १९१ धावांची खेळी केली. आज पाकिस्तान व द. आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्यपूर्व सामना खेळविला जाणार आहे.