कांगारूंचा १७९ धावांत खुर्दा

0
109

जोफ्रा आर्चरने ४५ धावांत घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर इंग्लंडने तिसर्‍या ऍशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ५२.१ षटकांत १७९ धावांत संपवला.

स्टुअर्ट ब्रॉडने दोन तर ख्रिस वोक्स व स्टोक्सने प्रत्येकी १ बळी घेत आर्चरला सुरेख साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (६१) याने आपले तिसावे व मार्नस लाबुशेन (७४) याने तिसरे कसोटी अर्धशतक लगावले. वॉर्नरने आपल्या खेळीत सात तर लाबुशेनने १० चौकार लगावले.