कांगारूंचा पाकला हिसका

0
111

>> दुसर्‍या टी-ट्वेंटीत ७ गड्यांनी विजय

स्टीव स्मिथ याच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने काल मंगळवारी कॅनबेरावर पाकिस्तानचा ७ गडी राखून सहज पराभव केला. माजी कर्णधाराने ५१ चेंडूंत नाबाद ८० धावा कुटत संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत १-० असे आघाडीवर नेले. सिडनीतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.
डेव्हिड वॉर्नरला लवकर बाद करणे श्रीलंकेला जमले नव्हते. पाकिस्तानने हे करून दाखवले. परंतु, भक्कम स्टीव स्मिथला भेदणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे १५१ धावांचे माफक लक्ष्य कांगारूंनी ९ चेंडू राखून सहज गाठले.

तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडले. बाबरने आपले सातत्य कायम राखत टी-ट्वेंटीमधील आपले १२वे अर्धशतक केले. डेव्हिड वॉर्नरच्या अचूक फेकीवर धावबाद झाल्यामुळे अर्धशतकानंतर त्याला पुढे जाता आले नाही. सहाव्या स्थानावरील इफ्तिखार अहमद याने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमध्ये प्रथमच अर्धशतकी वेस ओलांडताना ६४ धावा जमवल्या. बाबर-अहमद यांच्या अर्धशतकांमुळे पाकिस्तानला ६ बाद १५० पर्यंत पोहोचता आले.
पावसामुळे रद्द करावा लागलेल्या पहिल्या सामन्यातील संघच उभय संघांनी या सामन्यात खेळविला. मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना पर्थ येथे शुक्रवारी खेळविला जाणार आहे.

धावफलक
पाकिस्तान ः बाबर आझम धावबाद ५० (३८ चेंडू, ६ चौकार), फखर झमान झे. वॉर्नर गो. कमिन्स २, हारिस सोहेल झे. व गो. रिचर्डसन ६, मोहम्मद रिझवान यष्टिचीत कॅरी गो. एगार १४, आसिफ अली झे. कमिन्स गो. एगार ४, इफ्तिखार अहमद नाबाद ६२ (३४ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार), इमाद वासिम धावबाद ११, वहाब रियाझ नाबाद ०, अवांतर १, एकूण २० षटकांत ६ बाद १५०
गोलंदाजी ः मिचेल स्टार्क ४-०-२५-०, केन रिचर्डसन ४-०-५१-१, पॅट कमिन्स ४-०-१९-१, ऍडम झंपा ४-०-३१-०, ऍश्टन एगार ४-०-२३-२
ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. आमिर २०, ऍरोन फिंच झे. बाबर गो. इरफान १७, स्टीव स्मिथ नाबाद ८० (५१ चेंडू, ११ चौकार, १ षटकार), बेन मॅकडेरमॉट पायचीत गो. वासिम २१, ऍश्टन टर्नर नाबाद ८, अवांतर ५, एकूण १८.३ षटकांत ३ बाद १५१
गोलंदाजी ः मोहम्मद इरफान ४-०-२७-१, इमाद वासिम ४-०-३४-१, मोहम्मद आमिर ३.३-०-३२-१, शादाब खान ४-०-२५-०, वहाब रियाझ ३-०-३३-०