कला गुण देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

0
146

शालेय विद्यार्थ्यांना कला गुण देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने शालेय स्तरावर १२ वी पर्यंत कलागुण देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. क्रीडा खात्याकडून विद्यार्थांना क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी क्रीडा गुण दिले जातात. त्याच धर्तीवर मुलांना कला क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी कला गुण देण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले. कला अकादमीमध्ये नवीन साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन सभागृह आणि डॉक्युमेंटरी लायब्ररी स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. विस्तारीत प्रकल्पासाठी अकादमीच्या जवळील वन खात्याची जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.