कला अकादमी राज्य भजन स्पर्धेत हॅपी स्पोर्ट्‌स क्लब चिंबल प्रथम

0
135

कला अकादमी गोवा आयोजित पुरुष गटाच्या स्व. पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती राज्यस्तरीय भजन स्पर्धेत हॅपी स्पोर्टस् क्लब, चिंबलने ७५००० रुपयांचे प्रथम पारितोषिक व स्व. पं. मनोहरबुवा शिरगावकर चषक पटकाविला. ५०,००० रुपयांचे द्वितीय पारितोषिक श्री शांतादुर्गा भजनी मंडळ, कवळेला, तृतीय ४०,००० रुपयांचे पारितोषिक श्री वनदेवी संगीत संस्था, कायसुव तर ३०,००० रुपयाचे चौथे पारितोषिक श्री लक्ष्मी साखळ्यो भजनी मंडळ, रासईला प्राप्त झाले.
प्रत्येकी २० हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके श्री आदिनाथ भजनी मंडळ, उसगाव व श्री शंकरनाथ भजनी मंडळ, सत्तरी या पथकांना देण्यात आली.