कर्नाटकच्या मंत्र्याच्या ठिकाणांवर छापे

0
77

>> १० कोटी रुपये सापडले

गुजरातमधील ४४ कॉंग्रेस आमदार वास्तव्यास असलेल्या बंगळुरूमधील एका रिसॉर्टमध्ये त्या आमदारांची व्यवस्था पाहणारे कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. शिवकुमार यांच्या ३९ ठिकाणांसह अनेक मालमत्तांवर काल प्ताप्ती कर खात्याने छापे टाकले. कर चुकवेगिरीप्रकरणी टाकलेल्या या छाप्यांमध्ये अधिकार्‍यांना सुमारे दहा कोटींची रोकड सापडली. याप्रकरणी कॉंग्रसने तीव्र संताप व्यक्त केला असून संसदेतही मोठा गदारोळ झाला.
छापे टाकले त्यावेळी मंत्री शिवकुमार गुजरातच्या आमदारांना ठेवलेल्या रिसॉर्टमध्ये होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात आले. शिवकुमार यांच्या दिल्लीतील ठिकाणांमधून ७.९ कोटी रुपये तर कर्नाटकातील ठिकाणांमधून २.२३ कोटी रुपयांची रोकड सापडली.
प्राप्ती कर खात्याच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार शिवकुमार यांची प्रचंड प्रमाणात रियल ईस्टेट व अन्य क्षेत्रात प्रचंड अघोषित गुंतवणूक असल्याप्रकरणी तपासकाम सुरू झाले आहे. सिंगापूर तसेच अन्य देशांमधील त्यांच्या अशा गुंतवणुकीवरही खात्याची करडी नजर असल्याचे सांगण्यात आले. दिल्ली व कर्नाटकात हे छापे टाकण्यात आले. १२० अधिकार्‍यांच्या साथीला निमलष्करी दलांचे जवान होते.
दरम्यान, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी राजकीय सूड घेण्याचा हा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला आहे.