करण-सोहनला बॅडमिंटनचे जेतेपद

0
68

करण धावस्कर आणि सोहन नाईक यांनी साखळी शटलर्स क्लब आयोजित अखिल गोवा बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद प्राप्त केले. स्पर्धा साखळी क्रीडा संकुलात खेळविण्यात आली.
अंतिम सामन्यात करण-सोहन यांनी अनिकेत रेडकर व दीपक भानुशाली यांच्यावर २१-१९, २१-१७ अशी मात केली. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या फ्रेड्रिक फर्नांडिस/मनीष पंखानिय आणि आदित्य देसाई/प्रसाद देसाई यांनाही बक्षिसे देण्यात आली.