ऑस्ट्रेलियाची मालिकेत आघाडी

0
94

यजमान दक्षिण आफ्रिकेचा ११८ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ४१७ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी द. आफ्रिकेची ९ बाद २९३ अशी स्थिती झाली होती.

काल पाचव्या दिवशी जोश हेझलवूडने क्विंटन डी कॉकला वैयक्तिक ८३ धावांवर पायचीत करत द. आफ्रिकेचा डाव संपवला. सामन्यात १०९ धावांत ९ गडी बाद केलेला स्टार्क सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व द. आफ्रिकेचा यष्टिरक्षक डी कॉक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. सामनाधिकार्‍यांनी यावर अजून कारवाई केलेली नाही.

ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायन याला मात्र सामना मानधनाच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याच्या खात्यात एक दोषांकदेखील जमा करणात आला आहे. डीव्हिलियर्स धावबाद झाल्यानंतर लायनने आयसीसीच्या खेळाडूंसाठी असलेल्या आचारसहिंतेचा भंग केल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर बडगा उगारण्यात आला आहे.