ऑक्टेव @गोवा

0
113

 

– अनिल पै (मडगाव)

गेल्या तीन दिवसांपासून मडगाव येथील रवींद्र भवनाच्या खुल्या मंचावर उभारलेल्या भव्य व शोभिवंत अशा रंगमचावर लोकसंस्कृतीचे कार्यक्रम चालू आहेत. त्यात संगीत, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्या, रॉकबँड यांचे सांस्कृतिक लोक संस्कृतीचे दर्शन घडवित असून गोव्याच्या विविध भागातील लोक ते पाहण्यासाठी गर्दी करतात.

 

भारतीय संस्कृती पुरातन व विविध पैलूंनी युक्त, वैभवशाली जगामधील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. भारतातील विविध राज्ये, प्रांत व गावोगावी लोकसंस्कृतीची श्रीमंती पूर्णपणे भरलेली असून पिढ्यांपिढ्या ती जतन करणे व संवर्धनासाठी कला व संस्कृतीप्रेमी, ग्रामीण भागातील लोक प्राणपणाने वावरत आले आहे. या संस्कृतीचे दर्शन सर्व देशविदेशातील लोकांना व्हावे म्हणून भारत सरकारचे संस्कृती खाते प्रयत्न करते. त्याचाच एक भाग म्हणून पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार पूर्वोत्तर राज्यांचे कला व संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी विविध राज्यांत ‘ऑक्टेव’चे आयोजन करते. गेल्या तीन दिवसांपासून मडगाव येथील रवींद्र भवनाच्या खुल्या मंचावर उभारलेल्या भव्य व शोभिवंत अशा रंगमचावर लोकसंस्कृतीचे कार्यक्रम चालू आहेत.

त्यात संगीत, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्या, रॉकबँड यांचे सांस्कृतिक लोक संस्कृतीचे दर्शन घडवित असून गोव्याच्या विविध भागातील लोक ते पाहण्यासाठी गर्दी करतात.
भारत सरकारचे संस्कृती मंत्रालयामार्फत आयोजित भारताच्या पूर्वोत्तर राज्यांची कला व संस्कृतीचे देशातील अन्य राज्यात पोहचविणे व त्या राज्यांतील लोकांना या वैभवशाली जुन्या लोकसंस्कृतीच्या वारशाचा परिचय करून देणे हा उद्देश आहे. उदयपूर पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक श्री फुकरन खान यांनी सांगितले की, २००६ मध्ये याचे आयोजन दिल्लीत केले गेले. त्यानंतर २००८ पासून ऑक्टेवाची सुरवात झाली. त्यावर्षी सर्वप्रथम गोव्यात सादरीकरण केले गेले होते. त्यानंतर दोनदा मडगाव, एकदा पणजी येथे यावर्षी पुन्हा मडगाव येथे आयोजन केले आहे. या आठ वर्षांत चार वेळा गोव्याची निवड करून गोव्यातील लोक लोकसंस्कृतीचा मान राखणारे आहेत हे दाखवून दिले आहे.

या लोकनृत्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्किम व त्रिपुरा या सात राज्यांचा समावेश आहे. या सप्तरंगी लोकसंस्कृती व कला तसेच शिष्यकलेचे दर्शन लोक घेतात. दि. ८ नोव्हेंबर पासून दि. १० नोव्हेंबर पर्यंत दुपारी ३ ते रात्रौ ८ पर्यंत हस्तकला वस्तु, हातमागावरील कपडे, दागिने यांचे प्रदर्शन भरले असून विविध दालनातून तेथील हस्तकला बघायला मिळते. उत्तम कलाकुसर, शिल्पकला बघायला मिळत आहे. यात मातीची विविध तर्‍हेची भांडी, शोभेच्या वस्तू, पिशव्या, पर्सी, पहिला व पुरुषांसाठी कपडे, लुगडी, अलंकर वस्तु, फर्निचर, काठ्या, चित्रे, प्रदर्शनातील दालनात लोकांची मने आकर्षित करतात. त्या त्या राज्यांतील कलाकार, शिल्पकार दालन वस्तुच्या विक्री करण्यात मग्न असतात. यात महिलांचा भरणा जास्त आहे. या दालनातून फेरी मारल्यानंतर दिसून आले की या डोंगराळ पूर्वोत्तर भागातील लोक राकट नसून मने कलेने ओथंबून भरलेली आहेत. एक वैभवशाली जुनी शिल्पकला कशी जतन करून ठेवली याचे दर्शन होते.

सायंकाळी ६.३० ते रात्रौ ९ पर्यंत सजविलेल्या रंगमंचावर सातही राज्यांतील कलाकार लोकसंस्कृतीचे दर्शन, नृत्य, गाणी, वाद्यातून घडवितात. मणिपुरी, रासनृत्य व छत्र्या नृत्य, डोळ्यांचे पारणे फेडून गेले. या लोकनृत्यामध्ये अरुणाचल प्रदेशाचे टप्पू नृत्य व जूजू झा झा नृत्या, आसामचे रंगोली बिहू आणि भोरताल, मिझोरामचे चेराव व सारलाम लाई, मणिपुरचे पुंगचोलम, लाय हरोबा आणि थांगता, मेघालयातील वांग्ला व शाद सुक मुंसेन, नागालैंडचे नगाडा व अप्सिन कॉई, सिक्किमचे सिगी छम व चंडी नृत्य, त्रिपुराचे मामिन व होजागिरी या नृत्याचे आकर्षण आहे. या तीन दिवसांत समुह नृत्य, गायन वादनाने उपस्थित रसिकांचे मन तृप्त केले. सात दिवसांत गोव्यातील रसिकांना, कलाकारांना या लोकनृत्याच्या परंपरेचे दर्शन घडत आहे. पहाडी प्रदेशात ही संस्कृती जतन करण्यासाठी शारीरिक व मानसिक परिश्रम, आर्थिक पदरमोड करावी लागते. भारतातील सर्व वस्तुंपेक्षाही लोकसंस्कृती श्रीमंत संस्कृती आहे.

या ऑक्टोवाचे उद्घाटन थोर साहित्यिक व कलाप्रेमी गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, नगराध्यक्ष डॉ. बबित प्रभुदेसाई, संचालक फुकरान खान, कला व संस्कृती खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर, रवींद्र भवनचे प्रशांत नाईक, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर उपस्थित होते.

राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी गोवा व ईशान्येकडील प्रदेश यांच्यात भौगोलिक भिन्नता सोडल्यास फारसा फरक नाही. दोन्ही प्रदेशांची संस्कृती शेवटी एकच म्हणजे भारतीय संस्कृतीशी जोडलेली आहे. भारतीय संस्कृती ही मानवी मुलक आहे असे सांगितले. भिन्न वेश, भिन्न भाषा तरी पण आपण एकच आहोत. एकच भारतीय संस्कृतीच्या छत्राखाली आहोत. विविध राज्यांमधील संस्कृतीचे कलेचे आदानप्रदान व्हायला हवे असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. त्यातून आपुलकी, प्रेम वृद्धिंगत होत राहते.
या लोकवेदाचे आणखी दोन दिवस राहिले असून दर दिवशी शेकडो लोक गर्दी करीत आहेत.