ऐतिहासिक कांस्य

0
109

टेबल टेनिसमध्ये दक्षिण कोरियाकडून भारताला ३-० असा पराभव पत्करावा लागला. यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत ३९व्या स्थानावरील जी. साथियान याला पहिल्या सामन्यात ली सांगसू याने ११-९, ९-११, ३-११, ३-११ असे हरविले. यानंतर अटीतटीच्या लढतीत शरथ कमल याचा सिक जियोयंग याने ९-११, ९-११, ११-६, ११-७, ८-११ असा पराभव केला. २२ वर्षीय योजिन जांग याने अँथनी अमलराज याचा ५-११, ७-११, ११-४, ७-११ असा पराभव करत संघाला अजिंक्य राखले. उपांत्यपूर्व फेरीत जपानचा ३-१ असा पराभव करून भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस प्रकारातील आपले पहिलेवहिले पदक निश्‍चित केले होते. १९५८ साली टेबल टेनिसच्या समावेशानंतर चीनने सर्वाधिक ६१ सुवर्णपदके या प्रकारात मिळविली आहेत.