एलपीजी सिलिंडर ३ रु. महाग

0
132

विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ३ रु. वाढणार आहे. विक्रेत्यांचे कमिशन हे ग्राहकांना सोसावे लागते. १४.२ किलो सिलिंडरवरील कमिशन आता रु. ४३.७१ झाले आहे. दिल्लीत सिलिंडरची किंमत रु. ४१७ तर मुंबई रु. ४५२ बनली आहे. यापूर्वी डिसेंबर २०१३मध्ये कमिशन वाढविण्यात आले होते.