एमसीसी अकादमीला सरदेसाई अंडर-१६ क्रिकेट चषक

0
159

शुभम गजिनकरच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर एमसीसी क्रिकेट अकादमीने अंतिम सामन्यात पणजी अरसीसीचा ५२ धावांनी पराभव करीत वास्को वॉरियर्स क्रिकेट अकादमी आयोजित सौरभ सरदेसाई स्मृती अंडर-१६ आंतर आरसीसी क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
प्रथम फलंदाजी करताना एमसीसी क्रिकेट अकादमीने ४५ षट्‌कांत ४ गडी गमावम २३८ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तगात खेळताना पणजी आरसीसीचा डाव १८६ धावांवर संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक ः एमसीसी क्रिकेट अकादमी, ४५ षट्‌कांत ४ बाद २३८, (शुभम गजिनकर नाबाद १०९, आयुष वेर्लेकर ५६, कौशल हट्टंगडी ५० धावा. वेदान्त घाटवळ १-२०, आनंद अधिकारी १-४८, उदित यादव १-३७ बळी) विजयी वि. पणजी आरसीसी, ३८.१ षट्‌कांत सर्वबाद १८६, (प्रज्ञेश गावकर २४, लकमेश पावणे ४०, सागर वांतामुरी ३९ धावा. दीप कासवणकर ४-४३, सुजय नाईक २-२८, कौशल हट्टंगडी १-३२ बळी). समानावीर – शुभम गजिनकर (एमसीए क्रिकेट अकादमी).