एमपीटी प्रकल्पाबाबतची जनसुनावणी रद्द

0
161

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमपीटीच्या नियोजित विस्तार प्रकल्पाच्या चर्चेसाठी येत्या २५ एप्रिल रोजी आयोजित जनसुनावणी रद्द केली आहे.
मंडळाने एमपीटीचा पर्यावरण परिणाम मोजमाप अहवाल अपूर्ण असल्याने जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाने मागील महिन्यात एमपीटीच्या विस्तारीत प्रकल्पासंदर्भातील जनसुनावणीबाबत नोटीस जारी केली होती. एमपीटीचा मच्छीमारी जेटी, पॅसेंजर जेटी, मल्टीपर्पज जनरल कार्गो बर्थ आणि विकास कामांचा प्रस्ताव आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात यासंबंधी घेण्यात आलेल्या बैठकीत पर्यावरण मोजमाप अहवाल अपूर्ण असल्याचे आढळून आले. त्यामुळे जनसुनावणी रद्दबातल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंडळाने जारी केलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.