एफसी शिवोलीला होली क्रॉस करंडक

0
130

एफसी शिवोलीने आंबेली स्पोटर्‌‌स क्लबवर ५-१ असा विजय मिळवून २२व्या होली क्रॉस आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेचे काल विजेतेपद मिळविले. होली क्रॉस स्पोटर्‌‌स क्लबने व्हडलेमळ काकोडा मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते.

सामन्याच्या दुसर्‍या मिनिटाला आंबेलीच्या नियाल कार्दोझने सामन्यातील पिहला गोल नोंदविला. २३व्या मिनिटाला सिध्दांत शिरोडकरने शिवोलीला बरोबरी साधून दिली. २८व्या मिनिटाला सिद्धांतने स्वतःचा दुसरा गोल करत शिवोलीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ४८व्या मिनिटाला सिद्धांतने स्वतःची हॅट्‌ट्रिक पूर्ण करत आंबेलीच्या खेळाडूंना खांदे पाडण्यास भाग पाडले. ६८व्या मिनिटाला दलेश पेडणेकरने व ७०व्या मिनिटाला पुष्पराज मांद्रेकरने शिवोलीचा अनुक्रमे चौथा व पाचवा गोल केला. विजेत्या संघाने १,११,१११ रुपये व करंडकाची कमाई केली. उपविजेत्यांना ७७,७७७ रुपये व चषकावर समाधान मानावे लागले. कुडचडे-काकोडाचे नगराध्यक्ष फेलिक्स फर्नांडिस यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

वैयक्तिक बक्षिसे ः शिस्तबद्ध संघ ः मुरगाव युनायटेड कल्चरल अँड स्पोटर्‌‌स क्लब, अंतिम सामन्यातील पहिला गोल ः नियाल कार्दोझ (आंबेली), सर्वोत्तम गोलरक्षक ः विनीत आगरवाडेकर (शिवोली), सर्वोत्तम बचावपटू ः मायकल सिल्वा (आंबेली), आश्‍वासक खेळाडू ः दलेश पेडणेकर (शिवोली), सामनावीर ः सिद्धांत शिरोडकर (शिवोली).