एफसी गोवा-मुंबई सिटी आज आमनेसामने

0
115

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये बुधवारी एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी हे संघ आमनेसामने येत आहेे. गोव्याला रोखण्याच मुुंबाईचा निर्धार असेल.

गोव्याने सलग तीन सामने जिंकले आहेत. सर्जिओ लॉबेरा यांना हटवून क्लबने क्लिफर्ड मिरांडा यांना प्रशिक्षक केले. अचानक झालेला बदल संघावर नकारात्मक परिणाम करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील सामन्यात गोव्याने हैदराबादला ४-१ असे नमविले होते.

गोव्याचे ३३ गुण आहेत. ते तिसर्‍या क्रमांकावरील बेंगळूरु पेक्षा ४ गुणांनी पुढे आहेत. एटीके आणि गोवा यांचे प्रत्येकी ३३ गुण आहेत.
गोवा संघाचा गोलफरक कमी आहे आणि आमनेसामने कामगिरीचा निकष लागला तरीही कोलकता संघ सरस आहे. अशावेळी गोवा संघाला आणखी गुण गमावून चालणार नाही. त्यांचे आता केवळ दोन सामने बाकी आहेत.

मिरांडा यांनी सांगितले की, दोन संघ दोन वेगळे उद्देश समोर ठेवून खेळतील. सामना चुरशीचा होईल. चूक करून चालणार नाही. दोन्ही संघांसाठी सामना खडतर असेल. आमचा भर दोन्ही सामने जिंकण्यास आहे आणि इतर निकाल कसे लागतात हे आम्ही पाहू.
मुंबई मागील चार सामन्यात अपराजित आहे. मागील लढतीत त्यांनी जमशेदपूर संघाला २-१ असे हरवले. दुसर्‍या सत्रात त्यांनी दमदार खेळ केला. अमीने चेर्मिटी आणि विद्यानंद सिंग यांनी गोल केले. या कामगिरीमुळे गोवा संघाचा त्यांच्या मैदानावर मुकाबला करण्यास मुंबई संघाचे मनोबल उंचावले आहे.

मुंबई यानंतर चेन्नईन संघाविरुद्ध खेळणार आहे. मोसमाची सांगता त्यांच्यासाठी खडतर आहे. बाद फेरीचा स्पर्धक त्यांच्यासमोर असेल. मुंबई २६ गुण मिळवून चौथा आहे. चेन्नईन संघाचे २२ गुण असले तरी त्यांचा एक सामना बाकी आहे.

मुंबईचे प्रशिक्षक जोर्गे कोस्टा म्हणाले की हा सामना चुरशीचा असेल. गोवा संघाला बचावात्मक खेळ कसा करायचा हे माहीत नाही. त्यांची शैली तशीच आहे. पाहिले स्थान मिळावे म्हणून ते संघर्ष करतील. दोन्ही संघ दडपणाखाली खेळतील. प्रेक्षक या लढतीचा आनंद घेतील. आम्हाला तीन गुण मिळतील अशी आशा आहे.