एफसी गोवाचा सिग्नल्सवर आकर्षक विजय

0
88

भारतीय स्ट्रायकर मनवीर सिंगच्या दोन गोलांच्या जोरावर एफसी गोवा संघाने बांबोळी ऍथलेटिक स्टेडियमवर झालेल्या आयएसएस मोसमपूर्व मित्रत्वाच्या सामन्यात कोअर ऑफ सिग्नल्सवर ५-१ असा आकर्षक विजय मिळविला.
मनवीरच्या दोन गोल व्यतिरिक्त ह्युगो बौमास, ब्रँडन फर्नांडिस आणि एदु बेदिया यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला. सामन्याच्या ६व्याच मिनिटाला मनवीर सिंगने उजव्या पायाच्या जोरकस फटक्यानिशी एफसी गोवाचे खाते खोलले. २४व्या मिनिटाला मनवीरने आणखी एक गोल नोंदवित संघाला २-० अशा आघाडीवर नेले. ह्युगोच्या पासवर ब्रँडनने आघाडी ३-० अशी केली. तर ह्युगोने ३०व्या मिनिटाला संघाचा ४था गोल नोंदविला. ६६व्या मिनिटाला विष्णू छेत्रीने सिग्नल्सची पिछाडी ४-१ अशी भरून काढली. तर ८५व्या मिनिटाला लिस्टन कुलासोने घेतलेल्या कॉर्नर किकवर एदु बेदियाने हेडरद्वारे एफसी गोवाला ५-१ असा विजय मिळवून देणारा गोल नोंदविला. एफसी गोवाचा हा मोसमपूर्व मित्रत्वाच्या सामन्यातील सलग तिसरा विजय होय.