एन. डी. तिवारी यांचे निधन

0
162

नवी दिल्ली
आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी यांचे काल दीर्घ आजाराने वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. काल त्यांचा वाढदिवस होता. मेंदूतील रक्तस्रावामुळे तिवारी यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले अनेक महिने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, काल अचानक त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांचे दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी निधन झाले. तिवारी कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांपैकी एक होते. त्यांनी तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषविले होते. उत्तराखंडच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. १९९५ ते १९८८ या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. १९८६-८७ काळात ते केंद्रात मंत्री होती. त्यांनी २००७ ते २००९ या काळात आंध्र प्रदेशचे राज्यपालपद सांभाळले होते. वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन तिवारी कॉंग्रेसची स्थापना केली होती.