एका नवीन रुग्णामुळे गोव्यातील कोरोना रुग्णसंख्या ४८ वर

0
218

राज्यात कोरोना विषाणू बाधित आणखी १ रुग्ण काल आढळून आला. राज्यातील कोरोना बाधित (ऍक्टीव्ह) रुग्णांची संख्या ४८ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान काल विमानाने गोव्यात आलेल्या २६ जणांनी कोविड चाचणी केली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
राज्यात रस्ता मार्गाने आलेल्या एकाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे चाचणीत आढळून आले आहे. नव्याने कोरोना विषाणूची बाधा झालेल्या नागरिकाच्या सोबत रस्ता मार्गाने आलेल्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा झाल्याने कोविड हॉस्पिटलमध्ये यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे, असे मोहनन यांनी सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डात संशयित २ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत मागील २४ तास कोरोनाच्या ३६१ नमुन्यांपैकी २३९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून २३८ नमुने निगेटिव्ह आहेत आणि १ नमुन्याचा अहवाल पॉझिटीव आला आहे. त्या प्रयोगशाळेत १२२ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आंतरराज्य प्रवास केलेल्या १८३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर, १८९ जणांना सरकारी क्वारंटाईऩ सुविधेखाली आणण्यात आले असून सरकारी क्वारंटाईनखाली ६४४ जणांना ठेवण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६७ एवढी झाली आहे. त्यापैकी १९ कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४८ एवढी झाली आहे. मागील आठवड्यात कोरोनाचे १२ रुग्ण बरे झाले आहेत, असेही मोहनन यांनी सांगितले.