ऍपआधारीत टॅक्सी सेवेला सरकारचे प्राधान्य ः मुख्यमंत्री

0
113

>> चर्चेवेळी कामत, रेजिनाल्डचा बहिष्कार

ऍप आधारित टॅक्सी ही काळाची गरज आहे. टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनी तीन महिने गोवा माईल्सचा अनुभव घ्यावा. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या हिताचे रक्षण केले जाणार असून त्याना आवश्यक व्यवसाय मिळवून देण्याची तयारी आहे. परंतु, ज्यांना गोवा माईल्स नको त्यांनी स्वतःच्या टॅक्सी ऍप तयार करावा. त्यांना सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. राज्यात ऍप आधारित टॅक्सी सेवेला प्राधान्य दिले जाईल आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत काल दिली.

चर्चिल आलेमाव यांनी गोवा माईल्स प्रकरणी दाखल केलेल्या एका ठरावावर विधानसभेत सुमारे अडीच तास चर्चा करण्यात आली. गोवा माईल्सवर सरकार माघार घेणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. चर्चेत सहभागी बहुतांश सदस्यांनी स्थानिक टॅक्सी चालकांना विश्‍वासात घेऊन नवीन ऍप तयार करण्याची मागणी केली. या वेळी रेजिनाल्ड आणि सत्ताधारी सदस्य यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर रेजिनाल्ड आणि दिगंबर कामत यांनी सभात्याग केला.