उपसभापती आणि राष्ट्रवादीचे पुतळ्यासाठी खासगी प्रस्ताव

0
95

पर्वरी येथे विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्केरा यांचा पुतळा उभारण्यासाठी भाजपचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी दोन खासगी प्रस्ताव सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे काल सादर केले.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला १९ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनात पर्वरी येथे डॉ. सिक्केरा यांचा पुतळा उभारण्याबाबत खासगी प्रस्ताव दाखल करण्याची घोषणा उपसभापती लोबो यांनी केली होती. पर्वरी येथे आणखीन पुतळा उभारण्यास भाजपने विरोध केलेला असताना आमदार लोबो यांनी खासगी प्रस्ताव दाखल केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.