उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के

0
233

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये काल संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाचे धक्के दिल्ली, उत्तराखंड व उत्तर प्रदेश या ठिकाणी जाणवले.

रिश्टर मापकावर या भूकंपाची क्षमता ५ अशी नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र यामुळे मालमत्तेची हानी किंवा जीवितहानीचे वृत्त नाही.