उत्कर्ष हायस्कूल रिवण समूहगीत गायनात प्रथम

0
117

सांगे (न. प्र.)
समाज सेवा संघटनेच्या आराधना ग्रामीण वाचनालय मळकर्णेच्या वर्धापनदिन प्रित्यर्थ आयोजित राष्ट्रीय समुहगीत गायन स्पर्धेत उत्कर्ष हायस्कूल रिवण या शाळेला प्रथम पारितोषिक मिळाले. हॉली क्रॉस इन्स्टिट्यूट केपे व स. मा. विद्यालय वालकिणी सांगे या शाळांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. मळकर्णेच्या श्री. मल्लीकार्जुन सभागृहांत ही स्पर्धा झाली.
मंत्री निलेश काब्राल यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आरंभ झालेल्या या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ऍड. वल्लभ गावस देसाई, शैलेश संझगिरी उपस्थित होते. अन्य शालेय स्पर्धात अमीत खडिया व अपूर्वा गावकर (स. प्रा. वि. गावकरवाडा) क्लीफ्टन वाझ व अनामिका कुलासो (देवळामळ), दीक्षा मळीक व नियती मळीक (मळकपण) सानीप दाहीफुडे व आशा टिकादार (भिंडे) तसेच स. मा. वि. मळकर्णेच्या उत्कृर्षा गावकर, शिवम मळीक, गौतमी गावकर व आकांक्षा तलवडकर हे विद्यार्थी विजयी ठरले.
यावेळी विशेष गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी प्रज्वला मळीक, भुपाली गावकर, भक्ती पारकर यांचाही पालकांसमवेत सन्मान करण्यात आला. स्पर्धासाठी ऋषीकेश देसाई व धनंजय सावंत यांनी परिक्षकांचे काम केले. सन्माननीय पाहुण्यांनी वाचक चळवळ वाढण्यासाठी वाचनालयातर्फे चालविलेल्या उपक्रमांकाचे कौतुक केले. अध्यक्ष श्रीपाद सामंत यांनी स्वागत तर वा. स. समितीचे चंद्रकांत गावकर यांनी ऋणनिर्देश केला. कु. भक्ती दिलीप दाभोलकर हीने कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन केले. सौ. साईली नाईक, अक्षदा सामंत, दिलीप पावसकर, नेत्रा पावसकर, मृदुला पारकर, विवेक गावकर यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.