उच्च रक्तदाब

0
925

– डॉ. स्वाती अणवेकर

आपले ब्लडप्रेशर हे १४०/९० ााकस किंवा त्याहीपेक्षा जास्त काही काळाकरिता सतत मिळत असेल तर आपण असे म्हणायला हरकत नाही की आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. पण हे सिद्ध करायला डॉक्टरला वेगवेगळ्या वेळी रुग्णाच्या वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांमध्ये प्रेशर तपासूनच हे पहावे लागते.

उच्च रक्तदाब अर्थात हाय-ब्लड-प्रेशर किंवा यालाच अर्वाचीन वैद्यक शास्त्राच्या भाषेत आपण हाय-पर-टेन्शन असेदेखील म्हणतो. तर आधी आपण रक्तदाब म्हणजे काय ते समजून घेऊया. रक्त जेव्हा रक्तवाहिन्यांमधून वाहत असतं तेव्हा वाहत असताना त्याचा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब होय. ज्या व्यक्तीला उच्च-रक्त-दाबाचा त्रास आहे असे आपण म्हणतो तेव्हा त्याच्या शरीरातील रक्तवाहिन्यांमधून जेव्हा रक्त वहन करत असते तेव्हा रक्तवहनाचा प्रचंड दाब रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर पडत असतो.
खरे पाहता उच्च रक्तदाब हे बर्‍याच हृदयविकारांचे प्रमुख अथवा मूळ कारण म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या भारतातही याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आढळते. शहरांमध्ये संपूर्ण लोकसंख्येच्या २० ते ४०% लोकसंख्या ही उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे तर गावामध्ये हेच प्रमाण संपूर्ण लोकसंख्येच्या १२ ते १७% एवढे आहे. सर्वेक्षणाचे आकडे असेही सांगत आहेत की योग्य काळजी न घेतल्यास २००० साली जी उच्चरक्तदाबाच्या रुग्णांची संख्या ११८ दशलक्ष होती ती २०२५ पर्यंत २१४ दशलक्ष होणार.
रक्तदाब म्हणजे काय तर हृदय सतत करत असलेल्या संपूर्ण शरीरातील रक्तवहनाचे कार्य त्याचा जो दाब निर्माण होतो तो म्हणजे रक्तदाब होय. हा दोन प्रकारे मोजला जातो.
१) सिस्टोलिक प्रेशर – यालाच आपण बोली भाषेत वरचे प्रेशर असे म्हणतो. जेव्हा हृदयाचे डावे व्हेन्ट्रिकल आकुंचित होते त्यावेळेस जो सर्वांत जास्त आकुंचनाचा दाब निर्माण होतो तो सिस्टोलिक प्रेशर होय.
२) डायस्टोलिक प्रेशर – हा हृदयाच्या दोन ठोक्यांमधील रक्तदाब आहे. ज्यावेळी हृदयाचे स्नायू प्रसरण पावत असतात त्यावेळी हा दाब निर्माण होतो. यालाच खालचा प्रेशर असे म्हटले जाते.
याचा अर्थ ज्यावेळी तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमचे प्रेशर १२०/८० मिमिएचजी आहे असे सांगतात तेव्हा तुमचे सिस्टॉलिक प्रेशर १२० असते तर तुमचे डायस्टॉलिक प्रेशर ८० असते. प्रेशर हे कायम मिलीमीटर ऑफ मर्क्युरी या परिमाणाने मोजले जाते जे ााकस असे डॉक्टर्स लिहितात.
आता आपण उच्च रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर वाढणे म्हणजे काय ते समजून घेऊया.
आपले ब्लडप्रेशर हे १४०/९० ााकस किंवा त्याहीपेक्षा जास्त काही काळाकरिता सतत मिळत असेल तर आपण असे म्हणायला हरकत नाही की आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. पण हे सिद्ध करायला डॉक्टरला वेगवेगळ्या वेळी रुग्णाच्या वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांमध्ये प्रेशर तपासूनच हे पहावे लागते व नंतरच आपण म्हणू शकतो की याला उच्चरक्तदाबाचा त्रास आहे. अन्यथा काही व्यक्तींमध्ये काही काळाकरिता काही शारीरिक व मानसिक अवस्थांमध्ये प्रेशर वाढते व परत सर्वसाधारण होते आणि नीट तपासणी न करताच जर डॉक्टरांनी अशा रुग्णांना प्रेशर कमी करायचे औषध सुरू केल्यास बरेचदा त्या व्यक्तीला नाहक त्रास भोगावा लागू शकतो.
आपला रक्तदाब हा पाच वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेला आहे तो आपण समजून घेऊया.
आपला रक्तदाब हा पाच वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेला आहे तो आपण समजून घेऊया.
१) हायपोटेन्शन – ९०/६० ााकस किंवा त्यापेक्षा कमी दाब असेल तर हा कमी रक्तदाब म्हणजेच बोली भाषेत याला ‘लो ब्लडप्रेशर’ किंवा ‘हायपोटेन्शन’ म्हणतो.
२) नॉर्मल बी.पी. ११९/७९ ााकस हा एकदम उत्तम प्रेशर मानले जाते.
३) प्रि-हायपर-टेन्शन ः हे प्रेशर म्हणजे वरचे १२०-१३९ आणि खालचे प्रेशर ८०-८९ असे असेल तर ते म्हणजे उच्च रक्तदाबाच्या पूर्वीची अवस्था.
४) स्टेज १ हायपरटेन्शन ः
वरचे १४०-१५९ आणि खालचे प्रेशर ९०-९९ असते. ही उच्च रक्तदाबाची प्राथमिक अवस्था आहे. यामध्ये रुग्णाला आहार-विहार व दिनक्रमात बदल सुचवून त्याने रक्तदाबात काही कमी येते का ते पाहिले जाते.
५) स्टेज २ हायपरटेन्शन ः
वरचे १६० किंवा जास्त आणि खालचे प्रेशर १०० किंवा जास्त. या अवस्थेत जीवनशैलीमध्ये बदल करून वैद्यांचा सल्ला घेऊन औषध घेणे आवश्यक असते.
उच्च रक्तदाबाची लक्षणे ः
काही व्यक्तींना रक्तदाब अगदी १८०/११० ााकसपर्यंत गेला तरी काहीच लक्षणे जाणवत नाहीत, जे खरोखरच अगदी हानीकारक आहे. पण काही व्यक्तींना खालीलप्रमाणे लक्षणे जाणवतात ती आपण थोडक्यात पाहू.
– डोेके् दुखणे
– उल्टी आल्यासारखे वाटणे
– उल्टी येणे
– चक्कर येणे
– धुसर किंवा दोन दिसणे
– नाकातून रक्त येणे
– छातीत धडधडणे
– श्‍वास घ्यायला त्रास होणे
क्रमशः …