ईव्हीएम, व्हीव्हीपॅट स्ट्रॉंग रूममध्ये

0
256

राज्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीतील मतदानानंतर सीलबंद करण्यात आलेली ईव्हीएम यंत्रे आणि व्हीव्हीपॅट पणजी आणि मडगाव येथील स्ट्रॉंग रूममध्ये कडक सुरक्षेत ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी काल दिली.

राज्यात २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदान केंद्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे सीलबंद करून तालुका पातळावरील केंद्रात आणण्यात आली. त्यानंतर मतदान यंत्रे जिल्हा निवडणूक कार्यालयात आणण्यात आली आहेत. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे आल्तिनो पणजी येथील सरकारी तंत्रनिकेतनच्या आवारात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमध्ये ठेवण्यात आली आहेत. तसेच उत्तर गोव्यातील म्हापसा आणि मांद्रे पोटनिवडणुकीत मतदान यंत्रे सुध्दा आल्तिनो येथील स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे मडगाव येथील स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत.

तसेच शिरोडा विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे सुध्दा याच ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे स्ट्रॉग रूम तयार करण्यात आले असून आवश्यक तिहेरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आतील भागातील सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. राजकीय पक्षाचे एजंट सुध्दा स्ट्रॉग रूमच्या बाहेर बसून सुरक्षेवर लक्ष ठेवू शकतात. मतदान यंत्रांची वाहतूक करताना जीपीएस सुविधा असलेल्या वाहनांचा वापर करण्यात आला आहे. दक्षिण गोव्यातील मतदान यंत्रे ठेवून बुधवारी सकाळी १० वाजता स्ट्रॉग रूम सीलबंद करण्यात आला आहे. या प्रक्रियेची व्हिडिओ रिकोर्डीग करण्यात आले आहे. मतदान यंत्रे स्ट्रॉग रूममध्ये नेताना तीन उमेदवाराचे एजंट सोबत होते, असेही दक्षिण गोवा निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले.